HW News Marathi
Covid-19

कोरोनावरील उपचारासाठी अशोक चव्हाण लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढील उपचारासाठी अशोक चव्हाण हे आज (२५ मे) नांदेड-मुंबई हा प्रवास ते बाय रोड अर्थार रस्तेमार्गे करत आहेत. अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणले जात असून या प्रवासासाठी १२ तासांचा प्रवास करत मुंबई दाखल झाले आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर असून मुंबईकडे रवाना झाले. लॉकडाऊनच्या काळात अशोक चव्हाण नांदेडमध्ये होते. पण, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ते मुंबईला आले होते. निवडणुकीनंतर चव्हाण हे पुन्हा नांदेडला परतल्यानंतर त्यांनी ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळे ठेवले होते. नांदेडमधील रुग्णालयात चव्हाण यांनी स्वॅब तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रिपोर्टनंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्येच उपचार घेतले. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचारासाठी रवाना झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk

विठू माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी २२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये मद्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

News Desk