HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण सर्वांना भारी..

नांदेड: महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. ८१ जागांपैकी ५५ जागा कॉँग्रेसने मिळवल्या आहेत. सत्तेची स्वप्तन पाहणा-या भाजपचा सुकडा साफ झाला आहे. त्यांच्या वाट्याला केवळ तीन जागा लागल्या आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला केवळ एक जागा आली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना केवळ नावापुरती शिल्लक राहीली आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी ठरतील असे चित्र दिसतेय. मागच्या निवडणुकीत नांदेडमध्ये ब-यापैकी यश मिळवणा-या एमआयएम फॅक्टर निष्प्रभ ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“समीर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल करा”, ज्येष्ठ वकिलाची पोलिसांकडे तक्रार

News Desk

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

News Desk

स्वत: मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोन करतात !

News Desk