मुंबई | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रात पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे.
Ashok Chavan,Maharashtra Congress Chief: I have submitted my resignation & now it's up to Congress President Rahul Gandhi to take call on whatever reshuffle & changes he wants to make. We fully authorise him to take call on this. I will be meeting Rahul Gandhi soon. (25.05.19) pic.twitter.com/4dzhH0QFd9
— ANI (@ANI) May 26, 2019
निकालाच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी घेणार आहेत आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत, असे चव्हाण यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले. काँग्रेसचा पराभव झालेल्या राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे सादर करत पक्षांतर्गत फेरबदलास वाट मोकळी करण्याची भूमिकाही चव्हाण यांनी मांडली होती.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर विजय मिळाला होता. यंदा मात्र काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या सुरेश धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. चंद्रपुरात त्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.