HW News Marathi
महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

मुंबई | औरंगाबाद मध्ये शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या किरकोळ वादाने व्यापक स्वरुप घेतल्यामुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही ठिकाणी दगडफेक करुन दुकाने आणि वाहनांना आग लावण्यात आली होती. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान , काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले यात औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले होते.

कोळेकर यांच्यावर औरंगाबादमध्ये एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना श्वसनास त्रास होत आहे. कोळेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. कोळेकर यांचे पुढील उपचार मुंबईतील होणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या नावे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार

News Desk

ED अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी! – गृहमंत्री

Aprna

लॉकडाऊनचे योग्य नियोजन नाही, सोनिया गांधींची पंतप्रधानांवर टीका

News Desk