HW News Marathi
Covid-19

कोरोनामुळे मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

मुंबई | देशातील लॉकडाऊनचे नियमाचे पालन करण्यासाठी राज्यातील पोलीस दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहे. यावेळी पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होत असून कोरोनामुळे मुंबई आणखी एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (३४ वर्ष) यांचे कोरोनामुळे आज (१६ मे) पहाटे निधन झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात सातवा बळी गेला.

अमोल हनुमंत कुलकर्णी यांनी ताप आणि सर्दीमुळे आजारी होते. कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात १३ मे रोजी चाचणी करण्यात आली. यानंतर कुलकर्णी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू आहेत. या पाश्वभूमीवर ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली. या पोलीस कर्मचाऱ्यांना २७ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मागेल त्याला ‘वॅक्सिन’ द्या!”, अशोक चव्हाणांची मागणी

News Desk

मुंबईत आज १३९० नवे रुग्ण, तर दादरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत होतेय वाढ !

News Desk

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू | राजेश टोपे

News Desk