HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई | मालाड पूर्व येथील सुमारे १५० रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिकेनं घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. ही घरे एमएमआरडीएकडून पाडण्यात येत असून, कारवाईला विरोध केल्याप्रकरणी अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

भातकाळकरांना झाली अटक

कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्वीट करून माहिती दिली असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकार करत आहे अत्याचार

महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षात वादावादी हे काही नवीन नाही. अशाच एका नवीन वादाला तोंड फुटलंय. अतुल भातखळकर यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे. “ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत”, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्षाचं दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?”, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा

“आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा… पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायला पंकजा मुंडेंना शिवसेनेत जावं लागेल -विनायक मेटे

News Desk

राज ठाकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर गंभीर आरोप!

News Desk

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Manasi Devkar