HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईत होणार राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद, नारायण राणे, आठवले, दरेकर लावणार हजेरी

नवी मुंबई | मराठा आरक्षणावरुन संपूर्ण राज्यात रान पेटलेलं असताना आता आज (२५ जून) नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडत आहे. या परिषदेला माजी मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार असल्याने सगळ्यांच्या नजरा या परिषदेकडे लागल्या आहेत. दुपारी एक वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे.

मराठा गोलमेज परिषदेला 3 मोठ्या नेत्यांची उपस्थिती

राज्यातील 42 मराठा संघटना, सकल मराठा समाज तसंच मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरआणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत ठराव काय?

फडणवीस सरकारच्या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून दिलेले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने पुन्हा एकदा प्रामाणिक प्रयत्न करून हे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला विशेष सवलती व 3 हजार कोटीचे आर्थिक पॅकेज द्यावे. या सरकारने पदोन्नती आरक्षणा संदर्भातही संभ्रम निर्माण करून ठेवला आहे. हा संभ्रम लवकरात लवकर दूर करावा तसेच लस खरेदीचे वाचलेले 7 हजार कोटी रुपये बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, शेतकरी, कष्टकरी वर्गाला पॅकेज रूपाने द्यावेत,” या मागण्या करत भाजपने ठराव केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk

मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी, संधी मिळताच आडवं करावं !

News Desk

“हॅलो, उद्धव ठाकरे बोलतोय, मोदीजी २ मे नंतर बोलतील”, सत्यजित तांबेंचं उपरोधिक ट्विट

News Desk