HW News Marathi
महाराष्ट्र

…पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून आयपीएल सामने मात्र भरवता येतात, भाजपने पवारांना डिवचले!

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारवर सतत टीका केली होती. “राज्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता किंवा मतं जाणून न घेताच केंद्रानं कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही,” असं म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“केंद्रानं कृषी कायदे रेटले, दिल्लीत बसून शेती करता येत नाही. पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून दहा वर्षे आयपीएल सामने मात्र भरवता येतात,” असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आता पुन्हा यावर शरद पवार काय उत्तर देणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

“राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही”, असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला होता. ते पीटीआयशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर निशामा साधला होता. महिनाभरापासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या पुन्हा होणाऱ्या बैठकीपूर्वी मंगळवारी शरद पवारांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. तसंच बैठकीत तोडगा न निघाल्यास सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांचे विमानतळावर स्वागत, कलम ३७० रद्द केल्याबद्दल ३७० तोफांची सलामी

News Desk

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू – देवेंद्र फडणवीस 

News Desk

मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – वरुण सरदेसाई

News Desk