HW News Marathi
देश / विदेश

भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा ! अतुल भातखळकरांची माहिती

मुंबई । “विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे. पण ती कोणी केली ? हेच उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे”, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (५ जुलै) OBC आरक्षणावरुन सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी सभागृहात मोठा राडा झाला. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या दालनातही मोठा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या आमदारांनी दालनात धक्काबुक्की आणि आई-बहिणीवरुन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला. याच पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झाला आहे.

अतुल भातखळकर याविषयी बोलताना पुढे म्हणाले की, “शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.” दरम्यान, निलंबनाच्या कारवाईनंतर दाद मागण्यासाठी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्यासह १२ आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तब्बल ३५ मिनिटांची चर्चा झाल्याचे सांगितले जाते. राज्यपालांसोबतच्या या भेटीनंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलार यावेळी म्हणाले की, “भाजपच्या आम्हा १२ आमदारांना निलंबित करण्याचे षडयंत्र ठाकरे सरकारने केले. त्याचे सत्यकथन आम्ही माननीय राज्यपालांसमोर ठेवले आहे. आम्ही यावेळी राज्यपालांना विनंती केलीय कि ज्या आरोपांवर आमचं निलंबन केलं गेलं त्याचा अहवाल राज्यपालांनी मागवावा. आणि तो अहवाल बघितल्यानंतर आमच्या निवेदनावर आणि आमच्या निलंबनावर उचित कार्यवाही राज्यपालांनी करावी. आमचं संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून उचित निर्णय करू अशी ग्वाही राज्यपालांनी आम्हाला दिली.”

भाजपचे हे १२ आमदार निलंबित

OBC आरक्षणावरील ठरवादरम्यान राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या एकूण १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या वर्षभरात या १२ आमदारांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मनाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

News Desk

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

News Desk

#PulwamaAttack : केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक बैठक सुरु

News Desk