HW News Marathi
महाराष्ट्र

“११ लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम”

मुंबई | भांडुपच्या ड्रीम मॉल मधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम कमी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तीन दिवस उलटून गेलेले असताना सुद्धा अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा साधे चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले नाही.

इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील खाजगी रुग्णालयांमधील खाटा अधिग्रहित करण्याच्या यादीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील व ३१ मार्च रोजी परवाना संपणाऱ्या सनराइज हॉस्पिटलचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, यातून शिवसेनेच्या वरदहस्तामुळेच सनराइज हॉस्पिटल सुरू होते हे सिद्ध होते, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्धे व महापालिकेतील कर्मचारी यांना उपचार घेता यावा या सबबीखाली सनराइज हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली. या मान्यतेच्या प्रक्रियेसाठी महापालिकेचे अधिकारी, सनराइज हॉस्पिटलचे संचालक यांचा ‘रिव्हायवल सनराइज हॉस्पिटल’ या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला, 25 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या अर्जावर अर्थपूर्ण संवादातून केवळ दहा दिवसात नाममात्र प्रक्रिया करून 6 मे 2020 ला परवानगी देण्यात आली. असे करताना मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला.

हीच अवस्था मुंबईत मागील दहा वर्षात झालेल्या अनेक आगीच्या घटनेत आपल्या लक्षात येईल. कमला मिल येथील दुर्घटना असो किंवा मागच्या वर्षी सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग असो किंवा त्या अगोदरच्या अनेक घटनांमध्ये बेकायदेशीर रित्या बांधकाम करण्यात आलेले होते किंवा अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले होते, हे समोर आलेले असताना सुद्धा ‘टक्केवारीपूर्ण’ काम करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने त्याकडे कानाडोळा करण्याचे काम केले, असा आरोप सुद्धा अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील! – अब्दुल सत्तार

Aprna

“14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?”, भाजपचा सवाल

News Desk

शरद पवारांचं वयं वाढतयं तसा त्यांचा हिंदू धर्माबाबत रागही वाढतोय !

News Desk