HW News Marathi
महाराष्ट्र

मुला- मुलींच्या सम-विषम वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता

अहमदनगर | प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकर यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टात वाद विवाद सुरू होता. अखेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज गेल्या काही महिन्यापासून वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता.

या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सरकारपक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर कसे दोषी आहेत ही बाजू मांडली. तर इंदोरीकर यांच्या वकिलांनी सक्षमपणे बाजू मांडत निकाल इंदोरीकर महाराजांच्या बाजूने लावला आहे.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज ५ वाजता महत्वाची बैठक

News Desk

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit

बारामतीत होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

swarit