HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (११ जून) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. राजाभाऊ फड यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. दरम्यान, या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.

Related posts

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

News Desk

शिर्डीत शेतक-याला पोलिसांनी केली बेदम मारहान

News Desk

‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय !

Gauri Tilekar