HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

औरंगाबादची निवडणुक हिंदुत्त्वाच्या मुद्दयावर लढणार !

Chandrakant Patil

नवी मुंबई | महाविकास आघाडीतील सरकारमध्ये असणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता. सेनेपाठोपाठ आता मनसेनेही पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेनेही हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्याचे संकेत दिल्याने भाजपनेही आता प्रखर हिंदुत्वाचा नारा दिला आहे. येणाऱ्या काळात औरंगाबाद महापालिका निवडणूक होणार आहे आणि औरंगाबादच्या विकासाच्या मुद्द्याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही लढण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (१५ फेब्रुवारी) केली.

भाजपच्या राज्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राज्यव्यापी अधिवेशन नवी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. येणाऱ्या काळात नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे.  दरम्याने, यंदाच्या या महत्त्वाच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवण्यात येतील. औरंगाबाद पालिकेतही विकासाचा मुद्दा राहिल. मात्र त्याचबरोबर आम्ही औरंगाबाद पालिका निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही लढणार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. औरंगजेब आमचा पूर्वज नव्हता तर  संभाजी राजे आमचे पूर्वज होते. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे,  असा अट्टहास त्यांनी यावेळी धरलेला दिसला.

भाजप हा पक्ष लोकल प्रश्नांसाठी जन्माला आलेला नाही. आम्ही राष्ट्रीय प्रश्नांसाठी जन्माला आलेलो आहोत. काश्मीर वाचला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, हे आमचे प्रश्न आहेत, असे सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार फसवे सरकार आहे, असा टोलाही महाविकास आघाडीच्या सरकारला त्यांनी लगावला. राज्यात भाजपचे सरकार असताना आम्ही काय विकास केला आणि आगामी काळात आमचे विकासाचे व्हिजन काय असेल? यावर या अधिवेशनात चर्चा होईल, असेही स्पष्टीकरण त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले. मनसे सोबत होणाऱ्या युतीबाबत प्रश्न विचारला असता, मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण जोपर्यंत मनसे परप्रांतियांबाबतची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत युती होणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Related posts

कुर्ला रेल्वे स्थानकात आत्महात्येचा थरार, सीसीटीव्हीत कैद

धनंजय दळवी

मुरूड आता जागतिक पर्यटन स्थळ

News Desk

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

News Desk