HW News Marathi
महाराष्ट्र

मराठीचा आग्रह धरल्याने सराफाची लेखिका शोभा देशपांडेंशी गैरवर्तणूक, देशपांडेंचे ज्वेलर्स बाहेर आंदोलन

मुंबई | मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. सराफ दुकानदार मराठीमध्ये बोलला नाही आणि मराठी बोलण्यास सांगितल्यावर हुज्जत घातली असा आरोप देशपांडे यांनी केला आहे. काल (८ ऑक्टोबर) रात्री पासून लेखिका देशपांडे यांचे ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. पोलिसांकडून आपल्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याचे शोभा देशपांडे म्हणाल्या. दरम्यान शोभा देशपांडे यांची भूमिका कौतूकास्पद असून काही वेळात आपण तिथे पोहोचत असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोभा देशपांडे यांच्या सोबत फोनवरून संवाद साधल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शोभा देशपांडे यांचे म्हणणे ऐकून घेतले. तुमचे म्हणणे योग्य आहे. मुद्दा रास्त आहे. प्रकृतीची काळजी घ्या असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी ज्वेलर्स इथे जाऊन त्यांची भेट घेतली.

काय आहे प्रकरण ?

लेखिका शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. तसंच दुकानाचा परवाना दाखवा असंही सांगितलं मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला. मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर लेखिका शोभा देशपांडे यांनी गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेरच ठिय्या आंदोलन केलं होतं. दुकानदार येऊन जोवर दुकानाचं लायसन्स (परवाना) दाखवत नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर दुकानदाराला मनसे स्टाइल दणका दाखवल्यानंतर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरले आहेत.

संदीप देशपांडे यांनी काय म्हटले आहे?

लेखिका शोभा देशपांडे यांनी ग्राहक म्हणून मराठीत बोला ही केलेली मागणी मुळीच चुकीची नाही. मात्र त्यांना दुकानदाराने जी वागणूक दिली ती फक्त चुकीची नसून निषेधार्ह आहे. एवढंच नाही तर पोलिसांनीही या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवली. घरात बसलेल्या सरकारला याची जाणीव आहे का? असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. एवढंच नाही तर महावीर ज्वेलर्सच्या सराफाने माफी मागितली आहे. पण अद्यापही परवाना दाखवलेला नाही. तो परवाना दाखवत नाही तोपर्यंत दुकान उघडू शकणार नाही याची काळजी मनसे घेईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर”, रामदास आठवलेंचा नारायण राणेंना जाहीर पाठिंबा

News Desk

देवरे ध्वनिफीत प्रकरणाला वेगळे वळण…

News Desk

“सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?”, नारायण राणेंचा गंभीर सवाल

News Desk