HW News Marathi
महाराष्ट्र

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नाही, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठी भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला मनसेने चोप दिला होता. शोभा देशपांडे यांनी १२ तासांपेक्षा जास्त अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला चोप दिला. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लेखिका शोभा देशपांडे यांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

लेखिका शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. तसंच दुकानाचा परवाना दाखवा असंही सांगितलं मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला. मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर लेखिका शोभा देशपांडे यांनी गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेरच ठिय्या आंदोलन केलं होतं. दुकानदार येऊन जोवर दुकानाचं लायसन्स (परवाना) दाखवत नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर दुकानदाराला मनसे स्टाइल दणका दाखवल्यानंतर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची केलेली मागणी भाजपाला मान्य आहे का? – महेश तपासे

News Desk

मी जन्माने आणि कर्माने हिंदूच – उर्मिला मातोंडकर

News Desk

लवकर जग कोरोनामुक्त होऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं!

News Desk