HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा क्रांती ठोक मोर्चा मैदानात…तुळजापुरात जागर मोर्च्याला सुरुवात

उस्मानाबाद | मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज आता पेटून उठला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकीय नेत्यांमध्येही वाद होताना पाहायला मिळत आहेत. यावरून आता वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तुळजापूर इथल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरूवात होत आहे. राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हा एल्गार आता थांबणार नाही, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. तुळजापुरातून होणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वात पन्नास हजाराहून अधिक मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे या दोघांबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याचा निषेध म्हणून मराठा समाजाने मोर्चाच्यावेळी आंबेडकरांविरोधात घोषणाबाजी केली. खरंतर, आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्याच्या आदेशाला थिएटरचालकांनी धुडकावले

swarit

‘मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं’, शर्मिला ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर, लोकल बंद करणे ‘हा’ शेवटचा पर्याय !

swarit