HW News Marathi
महाराष्ट्र

जसं राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही तसं पावसात भिजूनही पंतप्रधान होणार नाही – अवधूत वाघ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत त्यांनी राम मंदिराच्या भूमी पुजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. “राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. त्यावर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शरद पवारांना पलटवार केला आहे.

‘जसं राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही तसं पावसात भिजून देखील पंतप्रधान होणार नाही’, असा टोला अवधूत वाघ यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार यांनी पावसात उभे राहून केलेले भाषण खूप गाजले त्यावरूनच वाघ यांनी पलटवार केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड शहरात आता दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी “नो-व्हेईकल डे” 

News Desk

भोसरी प्रकरणात खडसे,पत्नी आणि जावयाविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र!

News Desk

आत्महत्या करणारे 26 % शेतकरी मराठा समाजाचे

News Desk