HW News Marathi
महाराष्ट्र

दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम असल्याने अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात!

ठाणे। दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला

मनसेने दहीहंडी साजरी करता यावी म्हणून नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधला होता. या ठिकाणी मनसेचे नेते अविशान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तसेच ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आलं होतं. मात्र, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांनी घटनास्थळी जावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसे सैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी आली होती. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी

आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी आहे. यासाठी आज सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैनात केला. सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेश मंडळाचा उपक्रम; गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलींना पाच हजारांची भेट

News Desk

रशिया-युक्रेन संघर्षावर शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले….

News Desk

“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार?”, कॉंग्रेसचा सवाल

News Desk