HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असून महाराष्ट्रातील संचार बंदी ही ३१ मार्चच्या पुढे नेत १५ एप्रिलपर्यंत करण्यातत आली आहे. काल (२५ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यात त्यांनी घरातील ए.सी शक्यतो बंद ठेवण्याचे आवाहन लोकांना केले आहे. कारण ए.सीच्या थंड तापमाणात हा विषाणूची संख्या जास्त वाढू शकते. त्यामूळे शक्यतो दारे, खिडक्या उघड्या ठेवून थंड आणि नैसर्गिक हवा घ्या असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेंच्या बाबतीत कोणतही हेळसांड होणार नाही. नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. दरम्यान, कोरोनाच्या या संकटापासून दोन हात करण्यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे सरसावत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही जणांनी मास्क आणि व्हेटींलेटर रुग्णालयांना दिले. तसेच, ज्यांचे पोट रोजच्या कामावर अवलंबून आहे अशा लोकांच्या मालकांना त्या कामगरांना पगार द्यावा अशी विनंती स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली.

Related posts

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

News Desk

सरकार शब्दांचा खेळ खेळू पाहत आहे !

News Desk

काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख दिव्या स्पंदनाचे ट्विटर अकाऊंट डिलीट

News Desk