HW News Marathi
Covid-19

अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

मुंबई | बहुप्रतीक्षित असा अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या बेळगावमधील पुजाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त बदलण्यासाठी मला देशभरातून धमकीचे फोन येत आहेत. भूमिपूजनाचा मुहूर्त न बदलल्यास परिणाम भोगावे लागतात”, अशी धमकी आपल्याला दिली जात असल्याचे त्या पुजाऱ्याने सांगितले आहे. त्याचप्रमाणे, आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे देखील या पुजाऱ्याने सांगितले आहे. एन. आर. विजयेंद्र शर्मा असे या पुजाऱ्याचे नाव आहे.

पुजारी एन. आर. विजयेंद्र शर्मा याबाबत तक्रार केल्यानंतर बेळगावमधील टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा देखील पुरविण्यात आली आहे. “मला फोन करून लोक विचारतात कि तुम्ही राममंदिर भूमिपूजनासाठी या तारखा का दिल्या ? हा मुहूर्त का काढला ? तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी का जात आहेत ? त्यावर मी त्यांना म्हटले की मला आयोजकांनी राममंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त सांगण्याची विनंती केली. त्याप्रमाणे, गुरु या नात्याने मी माझे कर्तव्यचे केले. मात्र, या धमकी देणाऱ्या लोकांनी आपले सांगितले नाही.” मात्र, आपल्या तक्रारीला गांभीर्याने घेतले जात असल्याचे पुजाऱ्याने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांचा मृतदेह बस स्टॅडवर, ‘हे’च गुजरात मॉडल आहे काय ?, मेवाणींनीचा सवाल

News Desk

१५ मार्चपर्यंत भारतात कोरोना नाही असा मोदी सरकारचा दावा होता – जितेंद्र आव्हाड

News Desk

दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना-युवकांना परतण्यासाठी प्रवासव्यवस्था करा !

News Desk