HW News Marathi
देश / विदेश

#AyodhyaRamMandir : …अन् पंकजा मुंडेंनी चित्र रेखाटत श्रीरामाला केले कलात्मक नमन !

परळी | प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण या ऐतिहासिक आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. पंकजा मुंडे यांनी कलात्मक पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. उपजतच चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी स्वतः श्रीरामाचे चित्र साकारत त्यांना कलात्मक पद्धतीने नमन केले आहे.

अयोध्येत श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर असावे”, या इच्छेला पूर्णत्वास नेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समस्त देशवासीयांचे स्वप्न या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतांना पंकजा मुंडे यांनी आपली श्रद्धा प्रकट केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत पंकजा यांनी आपला चित्रकलेचा छंद जोपासला आहे.

श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार्श्वभुमीवर पंकजा मुंडेंनी आपल्या भावविश्वातील प्रभु श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय चित्र साकारले आहे. या माध्यमातून भुमीपुजन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून या चित्राखाली “*Trying to put my trust through brush to bow down to the maryada purushottam “shree ram”.. big day ..*”असे लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…उशीरा का होईना शहाणपण आलं!”, पवारांची मोदींवर टीका

News Desk

“जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?”,फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर  

News Desk

सार्वत्रिक लसीकरणावर लक्ष केंद्रित; मनसुख मांडविय यांनी मिशन इंद्रधनुष 4.0 चा केला प्रारंभ

News Desk