HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना ३० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

नवी दिल्ली | बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरला लखनऊ विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. न्यायाधीश एस.के.यादव यांनी निकालाच्या दिवशी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.बाबरी मशीद पाडल्याप्रकरणात निकाल देण्यासाठी गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती.

बाबरी मशीद प्रकरणात एकूण ३२ आरोपी आहेत. यात उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हेही आरोपी आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशीद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी सीबीआय न्यायालयाला ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. पण त्यानंतर विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली.आडवाणी-जोशींशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशीद पाडणाऱ्या कार सेवकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला होता.

Related posts

पेट्रोल ४ रुपयांनी होणार स्वस्त

News Desk

झारखंडमधूनही भाजप हद्दपार, शरद पवारांची टीका

News Desk

HW Exclusive | भाजपची राज्य सरकारवर टीका, अमित देशमुखांनी दिला ‘हा’ सल्ला !

News Desk