HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या ४० आमदारांची यादी तयार आहे, बच्चु कडूंचा दावा

मुंबई | महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. या सरकारमध्ये प्रचंड विसंवाद आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. असे असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना एक खळबळजनक दावा केला आहे. “भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने राजकीय गोटात एकच खळबळ माजली आहे. “महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. तीन पक्षांचं सरकार अगदी व्यवस्थित चालू आहे. आमचं सरकार अस्थिर असण्याचा प्रश्नच नाही. याउलट विरोधी पक्षचं अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे आमच्या संपर्कात असलेल्या भाजपच्या 40 आमदारांची यादी तयार आहे”, दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
मात्र, असा दावा करणारे बच्चू कडू पहिले नेते आहेत का ? तर नाही. राज्याच्या विधानसभा अधिवेशनाच्या काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एक मोठे विधान केले होते. “विधानसभेपूर्वी आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले अनेक जण (आमच्या संपर्कात आहेत. मात्र, पक्षांतर करून सरकार टिकवणं हे आम्हालाही मान्य नाही म्हणूनच इच्छुकांना अजूनही आम्ही आमच्या पक्षात घेतलेले नाही”, असे जयंत पाटील त्यावेळी म्हणाले होते. त्याचसोबत भाजपचे १४ ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असेही जयंत पाटलांनी म्हटलं होत.
त्याचप्रमाणे काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील असाच दावा केला होता. “महाविकास आघाडीची चिंता करणाऱ्या भाजपला त्यांच्या १०५ आमदारांची गॅरंटी आहे काय? देवेंद्र फडणवीस ज्यांना घेऊन फिरतात ते कोण आहेत? कुठून आले आहेत? त्यांचे अनेक आमदार आमच्याकडून गेलेले असून ते आजही आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर भूकंप होईल”, असा गौप्यस्फोट यशोमती ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्रानं नवा फॉर्मुला देशापुढं ठेवला आहे आणि हा फॉर्मुला चालणार आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासूनच खरतर भाजपच्या नेत्यांनी हे सरकार अंतर्विरोधाने पडणार असे दावे करायला सुरुवात केली आहेत. सरकारमधील प्रमुख पक्षच्या नेत्यांची वारंवार समोर येणारी नाराजी, निर्णय प्रक्रियेतील समन्वयाचा अभाव यामुळे भाजपकडून केले जाणारे हे दावे अधिकाधिक ठाम होताना दिसतात. “आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. हे सरकार स्वतःहूनच कोसळेल. हे जनतेच्या मनातील सरकार नाही. फार काळ टिकणार नाही”, असे भाजपकडून वारंवार सांगितलंय जातंय.
एकीकडे भाजप हे दबावतंत्र आणि दुसरीकडे महाविकासआघाडीचे दावे पाहता नेमकं राज्यात काय सुरुये आणि पुढे काय घडणार ? असा प्रश्न आजही कायम आहे. आणि म्हणूनच आम्ही सुरुवातीपासून जे म्हणत आलो आहोत त्याप्रमाणे महाविकासाआघाडीची मोट बांधणाऱ्या शरद पवारांच्या मनात असेल तरच हे सरकार टिकेल त्यांच्या मनात असेल तरच हे सरकार पडेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विखे येताच विरोधकांकडून ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’च्या घोषणा

News Desk

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडले, फडणवीसांची टीकास्त्र

Aprna

काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं, राणेंचा गंभीर आरोप 

News Desk