HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एंट्री

अमरावती | राज्याचे शालेय राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असल्याचे आपण पाहतो.जरी सत्तेत असले तरी अनेक मुद्दयांवर सरकारला घेरण्यातही ते आघाडीवर असतात. आता तर चक्क राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एंट्री केल्याचं समोर आलं आहे.

अमरावतीच्या चांदुर बाजारतील मासोद या गावात तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. काल रात्री या स्पर्धेचे उद्घाटन

केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतःहा मैदानात उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला. गावखेड्यात चालत असलेल्या खेळाशी बच्चू कडू यांची आजही नाळ कायम आहे. कधी कुस्ती, कधी कबड्डी या खेळातून राज्यमंत्री बच्चू कडू हे मातीतील खेळाच मैदान गाजवत असतात. आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांची कबड्डी या खेळाची टीम होती. त्यामुळे त्यांना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांवरील अत्याचारासह सायबर क्राईम आमचे सर्वोच्च प्राधान्य – हेमंत नगराळे

Manasi Devkar

रोहित पवारांनी उपस्थित केला भाजपच्या संस्कारांवर प्रश्न!

News Desk

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांंना सुनावले!

News Desk