HW News Marathi
महाराष्ट्र

व्यंगचित्रातून राजकारणाची चित्रे रेखाटणारे एक राजकीय नेते

आपल्या व्यंगचित्रातून समाजात प्रबोधन करणारे एक राजकीय नेते म्हणजेच हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. २३ जानेवारी १९२६ रोजी केशव आणि रमाबाई ठाकरे यांच्या घरी एक कलाकार जन्माला आले. बाळासाहेब ठाकरे व त्यांचे कुटुंब हे महाराष्ट्राचे आदरणीय भूषण आहे. पेशाने व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नलमध्ये १९५० साली नोकरी सुरु केली. आपल्या व्यंगचित्रकाराच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गजांची चित्रे, व्यंगचित्रे काढली इतकेच नव्हे तर ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या समवेतही त्यांनी काम केले. पण मुळातच केशव सिताराम ठाकरे हे बाळासाहेबांचे वडील पेशाने पत्रकार होते तसेच समाजप्रबोधनात अग्रगण्य असल्याने बाळासाहेबांची पावलेही समाजप्रबोधनाकडे निघाली. पण सुरुवातीला प्रत्यक्षात राजकारणात न उतरता त्यांनी १९६० साली मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले.

मराठी भाषेतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. या साप्ताहिकाच्या माध्यमातुन बाळासाहेबांनी मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. फक्त राजकारण्यांसाठीच नव्हे तर बाळासाहेबांनी लहान मुलांसाठीही व्यंगचित्रे काढली. श्याम या लहान मुलासांठीच्या पाक्षिकाचे ते संपादक होते आणि त्यातुनचे ते लहान मुलांसाठीही व्यंगचित्रे रेखाटायचे. कालांतराने बाळासाहेबांच्या लक्षात आले की मराठी माणसावर होणारा अन्याय किंवा द्वेष हा केवळ व्यंगचित्र रेखाडून जाणार नाही तर सामान्य माणसांना सोबत घेऊन हा लढा लढणे गरजेचे आहे. आणि याच संघटीत होण्याच्या भावनेने आणि प्रबोधनारांच्या पाठिंब्याने आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेने १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली.

मराठी माणसाच्या हितासाठी प्रामुख्याने काम करायचे असा शिवसेनेचा महत्त्वाचा अजेंडा होता. शिवसेनेचा पाया रोवल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली. १९६७ सालच्या डिसेंबरमध्ये परळच्या दळवी बिल्डिंगवरील हल्ल्याच्या घटनेपासून शिवसेना-साम्यवादी संघर्ष चिघळला. १९७० साली जूनमध्ये साम्यवादी आमदार कृष्णा देसाईंचा खून झाला त्यामुळे परळला पोटनिवडणूक झाली आणि सेनेचे वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल लिहू तितके शब्द नक्कीच कमी पडतील. राजकारणातील त्यांच्या ५० वर्षाहून अधिक कालखंडात त्यांनी न डगमगता मराठी माणसासाठी, चुकीच्या प्रत्येक गोष्टींसाठी आवाज उठवला. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही – असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले.

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती देणे, झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करुन देणे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, अशा अनेक प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच होती. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून त्यांच्या शैलीने त्यांनी काम केले. राजकीय व्यासपीठावरून प्रक्षोभक भाषणं करून माणसं तोडणारे बाळासाहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र माणसं जोडत होते. त्यांच्यासारखा दिलदार नेता शोधून सापडणार नाही. आपल्या विरोधकांबद्दलही त्यांनी कधी कटुता बाळगली नाही. लेखक, कलावंत, व्यंगचित्रकारांच्या मैफलीत ते खुलायचे. असंख्य गरजू माणसांना त्यांनी मदत केली. यामध्ये अनामिक व्यक्तींपासून संजय दत्त-अमिताभ बच्चनपर्यंत सिताऱ्यांचाही समावेश आहे. बाळासाहेबांनी शब्द दिला आणि पाळला नाही असं क्वचितच घडलं. यातूनच त्यांच्या करिष्मा तयार झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय कळेल !

News Desk

“केसेस कशा रद्द करायच्या हे अजितदादांकडून शिकावं”, नारायण राणेंची पवारांवर टीका!

News Desk

“असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?”

News Desk