मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारण, आरक्षण,जातीचे राजकारण या सर्व विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्व देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात कसा आला याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, जात आणि हिंदुत्व दोन वेगळ्या गोष्टी आहेत. १९८० ते १९८२ चा काळ पाहिला तर खासकरुन या गोष्टीला सुरुवात झाली तेव्हा शहाबुद्दीन नावाचे खासदार होते. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या आणि त्याच वेळी शाहबानो प्रकरण मोठं झालं होते. त्यावेळी मोठा मुस्लिम समुह रस्त्यावर आला, रस्तेच्या रस्ते ब्लॉक करणं, नमाज पडणं अशा अनेक गोष्टी सुरु झाल्या. १९८१ रोजीची भिवंडीची दंगल त्यामुळेच झाली होती. ती दंगल बांद्रा पर्यंत आली होती. शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकसभेत बदलला होता. तो निर्णय बदलल्यामुळे शहाबुद्दीने बाबरी मस्जिदी संबंधांत काही गोष्टी सुरु केल्या.
एकदा काहीतरी होऊन जाऊन दे…
हे प्रकरण दिवसेंदिवस मोठा होत चालला होता. त्यावेळी हिंदुत्त्वाचा विषय नव्हता. जेव्हा हे सगळं वाढायला लागले तेव्हा एका टप्प्यात आल्यावर देशातील हिंदूंना वाटले एकदा काहीतरी होऊन जाऊन दे… वातावरणात जर ती गोष्ट नसेल तर आणि तुम्ही जर ती गोष्ट सांगायला गेला तर लोकांना कळणार नाही. ती गोष्ट वातावरणात होती बोलत कोण नव्हते. ती गोष्ट पहिल्यांदा बोली गेली असेल तेव्हा साधारपणे १९८४ मध्ये इंदिरा गांधी गेल्या.. मग राजीव गांधी तेव्हा १९८५ असेल तेव्हाचा जो शहाबानोचा काळ असेल त्यावेळी वातावरणाला जर कोणी हिंदुत्वाची हाक दिली असेल बोलं असेल तर ते पहिले बाळासाहेब ठाकरे होते असे राज ठाकरे यांनी सांगितले आहं.
हा एक वेगळा मुद्दा
दरम्यान राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, त्यानंतर पहिली निवडणूक विलेपार्लेची निवडणूक झाली. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भाजप अध्यक्ष होते. त्यावेळी भाजपचा गांधीवादी समाजवाद होता. त्या निवडणूकीनंतर अटलजी गेले आणि अडवानीजी आले मग सगळं प्रकरण सुरु झाले. मग रथयात्रा, विटा, बाबरी मस्जिद मग राम मंदिर यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वातावरणात होती आणि नंतर ती मोठी झाली. प्रत्येकाच्या मनामध्ये होतं आणि हे बोललं पाहिजे. हा एक वेगळा मुद्दा आहे असे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर कोण
जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. पाहिलं तर जातीचा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रात झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर, कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे.
जातीच्या लोकांनी बोललंय
मग शिवाजी महाराजांचा इतिहास चुकिचा सांगितला गेला, शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर बोललं मग ते ह्या जातीच्या लोकांनी बोललंय, मग हे बोलले, प्रत्यक्षात काय? पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी साताऱ्यातील जाधव नावाच्या मुलानं फोनवर बोललं की, मोरोपंत पिंगळे या सर्वांनी शिवाजी महाराजांना विष दिलं आणि शिवाजी महाराज ओरडत होते त्यामुळे त्यांनी तोंडावर उशी दाबून ठेवली आणि मारलं.. तर त्या मुलाने विचारले हे संदर्भ तुम्ही कुठून आणलेत. हे कुठून कळलं? यामध्ये शेवट असा आहे की, खेडेकर म्हणाले मला जे वाटल ते मी लिहील मला वाटेल ते मी लिहीन असं त्यांनी म्हटलय.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.