मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक गंभीर आरोप केला आहे. “ब्राम्हण असल्याने मला टार्गेट केले जात आहे”, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. महाधिवक्ते आशुतोष यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर फडणवीसांवर मोठी टीका झाली. त्यानंतर, फडणवीसांनी आता हा आरोप केला आहे.
न्यायालयात बाजू मांडू नये असे फडणवीस सरकारकडून सांगण्यात आल्याने उच्च न्यायालयात युक्तीवाद केला नाही, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. त्यानंतर फडणवीसांवर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे. “मराठा आरक्षणाची लढाई सुरु असतानाच फडणवीसांना हे का आठवलं?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला जात असतानाच फडणवीसांनी हे वक्तव्य केले आहे. यापूर्वीही सत्तेत असताना “ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे पवारांच्या पचनी पडत नाही”, असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे, फडणवीसांना असं नेमकं का वाटतं ?असा प्रश्न उपस्थित होते.मराठा आरक्षणाच्या संघर्षादरम्यान देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरुन नेमकं कोण करतं? फडणवीस त्यांचं नाव का सांगत नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.