HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या मध्यस्थिमुळेच सेना – कंगनातील वाद निवळला, आठवलेंचा दावा

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सध्या चांगलेच विवाद सुरु आहेत. अशात रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल (१० सप्टेंबर) कंगना राणावतच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. त्यानंतर आज (११ सप्टेंबर) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मद्यस्थिमुळे शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील तनाव निवळल्याचा दावा केला आहे. तसेच,  येणाऱ्या काळात अभिनेत्री कंगना राणावत हिने राजकारणात यायचा निर्णय घेतलाच तर रिपाई आणि भाजपमध्ये तिचे स्वागत होईल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

या भेटीत तुम्ही कंगना राणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न आठवले यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय, मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात यायचे असल्यास आरपीआय किंवा भाजपमध्ये तुझे स्वागत आहे, हेदेखील मी तिला सांगितले. मात्र, तुर्तास आपला राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नाही. मला सध्या चित्रपटसृष्टीतच काम करायचे आहे, असे कंगना राणौत हिने सांगितले.

त्यामुळे कंगना ताबडतोब राजकारणात प्रवेश करण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र, ती भविष्यात राजकारणात आल्यास आम्ही तिचे स्वागत करू. तिने आरपीआय पक्षात प्रवेश केला तर मला १०० टक्के आनंद होईल, भाजपमध्ये प्रवेश केला तर ५० टक्के आनंद होईल. आरपीआयमध्ये तिला लगेच खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही. तिला चळवळीत काम करावे लागले. पण भाजपमधून तिला नक्कीच खासदारकीची संधी मिळू शकते, असे आठवले यांनी सांगितले.

तसेच आपल्या मध्यस्थीमुळेच शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील तणाव निवळल्याचा दावाही आठवले यांनी केला. कंगनाने मुंबईबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि मुख्यंमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखाशी मी सहमत नाही. मात्र, तिने भावनेच्या भरात हे वक्तव्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवता आली असती. मात्र, आता शिवसेनेने हा विषय मिटवला आहे. मी मध्ये पडल्यामुळे शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला. यानंतर मी कंगना राणौतलाही तू आता काही बोलू नकोस, असा सल्ला दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk

महसुली विभाग वाटप नियम 2015 मध्ये सुधारणा

News Desk

चिडलेल्या बच्चु कडूंनी स्वयंपाक्याला कानाखाली का मारली ?

News Desk