HW News Marathi
Covid-19

कोरोना परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील ‘या’निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढणारा आकडा शासन-प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यात विकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवस मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनापरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. अनेक बाबींवर बंधने आली आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात गंभीर होत जाणारी कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य सरकारकडून राज्यातील सहकारी संस्थांच्या म्हणजेच सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँकांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा आल्या आहेत. यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाने जाहीर केला आहे. दरम्यान, यापूर्वी ३१ मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी  

News Desk

आता सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांना पोशाखात मिळाली सूट

News Desk

जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील! 

News Desk