HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार होणं कुणाचंही काम नाही!

अहमदनगर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, ते रुग्णालयात दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी एका कार्यकर्त्याच्या भावना ट्वीट केल्या आहेत. एका कार्यकर्त्याने आपल्याला पाठविलेल्या या भावना शेअर करीत असल्याचे त्यांनी म्हटले असून पवारांच्या कार्याचे थोडक्या शब्दांत वर्णन करणारा हा संदेश चांगलाच व्हायरल होत आहे.

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘साहेब, कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा! सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. मधल्या काळात पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. पवार यांचे रुग्णालयातील वृत्तपत्र वाचनाचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले. तर दुसरीकडे पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारा मजकूरही व्हायरला झाला. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सायबर सेलकडे तक्रारही केली आहे.

हे सगळं सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने व्हॉटसॅपवर पाठविलेला संदेश रोहित यांना चांगला भावला. त्यांनी तो ट्वीट केला असून त्याला भरपूर लाइक्स मिळत आहेत. पवार यांच्या जखमी पायांचा जुना फोटो वापरून या कार्यकर्त्याने संदेशात म्हटले आहे की, ‘या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश-रेखांशावरील माती. किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापूरचा महापूर… संकटांच्या मानगुटीवर उभं राहून जनतेला दिलासा द्यायला हेच पाय धावले.. याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा… खांद्यावर आलं कितीही ओझं… तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार…किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे. हे पाय आहेत जमिनीवरचे… आणि याच जमिनीतील मातीचा टिळा आहे भाळी. त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत…पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी… कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, जे कधीच आटणार नाही. शरद पवार होणं कुणाचंही काम नाही..’, असा कार्यकर्त्याचा मेसेज रोहित पवारांनी खास पवारांसाठी ट्विट केला आहे.

सह्याद्रीच्या वनस्पतीला दिले शरद पवारांचे नाव

कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वतरांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला. या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राजकारणातील सह्याद्री अशी ओळख असलेल्या शरद पवार यांचे नाव समर्पित करण्यात आले आहे. ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वनस्पतींना पवारांचे नामकरण केल्याचं त्यांनी सांगितले आहे.

कोल्हापूरातील डाॅ.विनोद शिंपले आणि डाॅ.प्रमोद लावंड या दोन संशोधकांनी सह्याद्री पर्वत रांगेत एका नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या नव्या वनस्पतीचं ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ असं नामकरण करण्यात आलं आहे. पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल हे नाव दिलं असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे. गारवेल कुळातील ही वनस्पती असून, डाॅ. विनोद शिंपले गेल्या वीस वर्षांपासून या कुळातील वनस्पतींवर संशोधन करत आहेत. त्यांनी गारवेल कुळातील आतापर्यंत ५ नव्या वनस्पतींचा शोध लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तर कॉंग्रेसला 40 जागाही टिकविता येणार नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

बच्चू कडूंनी पुण्यातील घरमालकांना पत्राद्वारे कोणती विनंती केली ?

News Desk

सोनिया गांधींकडून ‘महाशिवआघाडी’ला मिळाला हिरवा कंदील | सूत्र

News Desk