HW News Marathi
महाराष्ट्र

रोहिणी खडसे यांनी बलात्काराच्या प्रकरणावरुन केली धनंजय मुंडेंची पाठराखण

जळगाव | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे आणि त्याचे निवेदनही ट्विट केले आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. तशा प्रकारे पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. दरम्यान, रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताच अनेकजण धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यास पुढे आले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीदेखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

रोहिण खडसे म्हणाल्या की, महिलांना कायद्याचं जे संरक्षण देण्यात आलं आहे. त्याचा कुठेही दुरुपयोग होऊ नये. एखादी महिला एखाद्या राजकीय नेत्यावर केसेस दाखल करुन त्याची प्रतिमा मलीन करत असेल तर त्यामुळे त्याचं खूप मोठ राजकीय नुकसान होतं. त्या राजकीय नेत्याने आयुष्यात कमावलेलं नाव मलीन होऊन त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्याचं आयुष्य उध्वस्त होतं. त्यामुळे असे खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर राज्य सरकारने त्याची कसून चौकशी करावी, नंतरच कारवाई करावी, जेणेकरुन महिलांसाठी दिलेल्या प्रोटेक्शन कायद्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा, ‘ईडी’च प्रकरण चालू !

News Desk

मोदी सरकारने काम करावे, बोलणे व डोलणे कमी करावे !

News Desk

फडणवीस सरकारच्या काळात धारावी पुनर्वसन प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा! – नाना पटोले

Aprna