HW News Marathi
महाराष्ट्र

भोंदू बाबांच्या नादी न लागता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवा –  रामदास आठवले

बाबा राम रहीम च्या भक्तांनी कायदा हातात घेऊ नये रामदास आठवले

मुंबई महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानातील कायद्यानुसार देश चालत आहे.कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही . त्यामुळे बाबा राम रहीम ला कायद्यानुसार झालेली शिक्षा मान्य करावी . त्यांच्या भक्तांनी कायदा हातात घेऊ नये असे सांगत अश्या भोंदू बाबांच्या नादी न लागता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .

बाबा राम रहीम यांच्या डेरा सच्चा सौदा या संप्रदायात दलितांचा भरणा अधिक आहे . राम रहीम च्या नादी लागलेल्या दलितांनी कायद्याचा मान राखून बाबा राम रहीम ला झालेली शिक्षा मान्य करावी .कोणीही कोणत्याही भोंदू बाबाच्या हातचे बाहुले होऊ नका . बाबा राम रहीम ने केलेली कृत्य ही निषेधार्हच होती. त्यामुळेच त्याला 10 वर्ष कारावास भोगण्याचा शिक्षा मिळाली आहे . या विरुद्ध रस्त्यावर उतरून हिंसाचार करून कायदा हातात घेऊ नका असे आवाहन रामदास आठवलेंनी डेरा सच्चा सौदा च्या समर्थकांना केले आहे . भोंदू बाबांच्या नादी लागण्याचा मार्ग हा अज्ञान वाढविणारा आणि त्या अज्ञानातून दुष्कृत्य गुन्हा घडविणारा ; अधोगतीला नेणारा आहे या उलट महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रगतीचे; समतेचे; वैज्ञानिक दृष्टिकोनाचे ;संविधानिक अधिकारांचे; निर्भय स्वाभिमानी जगणे शिकविणारे आहे . त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवा ; भोंदू बाबांच्या नादी लागू नका असे आवाहन रामदास आठवलेयांनी केले आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिम जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसल्यास बॅड मार्निंग होईल  

News Desk

नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका, शिवसेनेचा इशारा

News Desk

“कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा करतो”, राऊतांचा मोदींना टोला

News Desk