HW News Marathi
महाराष्ट्र

“कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा करतो”, राऊतांचा मोदींना टोला

मुंबई | देशात एकीकडे कोरोना रूग्ण वाढत असताना दूसरीकडे तौक्ते चक्रीवादळाने हैदोस घातला आहे. महाराष्ट्रात या वादळाने धुडगूस घातल्यानंतर ते वादळ गुजरातला गेले होतें गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले होते. त्यांनी १००० कोटींची मदतनिधी देखिल दिली आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला 1000 कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत देतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 आणि 500 कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील आज कोकणच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे तेदेखील केंद्र सरकारला कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतील. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर तस तुम्ही राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका”, धनंजय मुंडेंची उपरोधिक टीका!

News Desk

‘महाविकासआघाडीचे कारभारी अपयशी म्हणून पवारांना या वयात बांधावर जावं लागतयं’,पडळकरांची टिका…

News Desk

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचे निधी वितरण लवकरात लवकर करा, अजित पवारांचे निर्देश

News Desk