HW News Marathi
महाराष्ट्र

शाहु महाराज जयंती निमित्त आयोजित दिंडीला उत्तम प्रतिसाद

उत्तम बाबळे

नांदेड :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४३ व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने “समता दिंडी”चे आयोजन करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे व मनपा आयुक्त देशमुख यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवुन मार्गस्थ करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, विविध शाळेचे असंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा फुले चौक परिसरापासून, शिवाजीनगर, कलामंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरुन दिंडी काढण्यात आली. समता दिंडीत विविध घटकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला व प्रतिसाद दिला. समता दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.

यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी ए. बी. कुंभारगावे, शिक्षणाधिकारी जयश्री गोरे, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापु दासरी, गटशिक्षणाधिकारी अशोक देवकरे, समता दुतचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये – रोहित पवार

News Desk

दूध आंदोलनासाठी काढलेला भाजपचा मुहूर्त चुकला – हसन मुश्रीफ

News Desk

आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून शिवसेनेचा फज्जा उडवला! – गोपीचंद पडळकर

Aprna