HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून द्यावी, शरद पवारांची मागणी

मुंबई | राज्यात १६ हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. आज (२७ जुलै) शरद पवारांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून देतील, असं विधानही पवारांनी केलं आहे.

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्याला पूराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं. माती वाहून गेली. मात्र, सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकारने काही मदत काल जाहीर केली, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • कायमस्वरुपी योजना करण्याची गरज
  • राज्यपालांचा आज दौरा ते केंद्राकडून मदत मिळवून देतील आणि द्यावीच
  • नेत्यांनी पुरग्रस्त भागात दौरे टाळावे
  • राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुरग्रस्तांना मदत केली
  • राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल
  • अहवाल आल्यानंतर मदतीचं धोरण जाहीर करेल
  • कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार
  • जीवनावश्यक बाबी पाठवणार, गॅस, भांडी, सतरंजी पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी पाठवणार
  • २-३ दिवसांत पूरग्रस्त भागात मदत पोहोचेल
  • राज्याला पूराचा मोठा फटकापुरामुळे राज्याचं मोठं नुकसान
  • राज्यात ६ ते७ जिल्ह्यात पूरामुळे बिकट स्थिती
  • राज्य सरकारही मदत करेल
  • घरं, शेतीचं मोठं नुकसान झालं
  • १६ हजार कुटुंबांचं मोठं नुकसान
  • मदत करण्याची आवश्यकता
  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाना, जिल्ह्यांना मदतीची गरज
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत पाठवली
  • स्थानिक स्तरावरही कार्यकर्त्यांनी मदत केली
  • १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादीकडून मदत
  • जीवनावश्यक वस्तूंच वाटप
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी इथे कोणतेही स्पष्टीकरण द्यायला आलो नाही ! – राज ठाकरे

News Desk

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

News Desk

‘अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं’

News Desk