HW News Marathi
महाराष्ट्र

“लेकीन हमें महाराष्ट्र के ‘राज’ के दर्शन नाही हुए थे”, राज ठाकरेंना भेटल्यानंतर राज्यपालांची प्रतिक्रिया!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आज (२९ ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. लॉकडाऊनमध्ये लोकांना रोजगार नाही, पैसा नाही तरीही लोकांची वीजबिलं चार-पाच पट आली आहेत, त्या बिलांच्या कपातीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या आजच्या भेटीकडे जसं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं, तसंच राज्यपाल स्वत:ही या भेटीसाठी उत्सुक होते असं निदर्शनास आले आहे. कारण या भेटीदरम्यान राज्यपाल राज ठाकरेंना सुरुवातीलाच म्हणाले, “हमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र के राज के दर्शन नही हुए”, असे म्हणत राज्यपालच राज ठाकरेंना भेटण्यास किती उत्सुक होते हे दिसून आले.

राज ठाकरे आज सकाळीच राज भवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले. राज ठाकरेंनी राज्यपालांसोबतच्या भेटीत लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आलेल्या वाढीव वीज देयकांचा मुद्दा मांडला. जर हॉटेल्स किंवा अन्य व्यवसायांना करात सवलत मिळत असेल तर वाढीव वीज देयकांचा भुर्दंड नागरिकांना का ? असा मुद्दा राज ठाकरेंनी सरकारसमोर उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्य सरकार याची दखल घेणार का? राज ठाकरे शरद पवार किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगावात चिकनगुनियाची साथ, नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष  

News Desk

आमचे सरकार स्थिर आहे, ज्यांना पाडून दाखवायचे आहे त्यांनी पाडून दाखवावे – नितीन राऊत

News Desk

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला इशारा, तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू….

News Desk