HW News Marathi
महाराष्ट्र

भंडाऱ्यामध्ये वडापाची टॅक्सी नदीत कोसळून भीषण अपघात

भंडारा | साकोली-लाखांदूर मार्गावर आज (१८ जून) दुपारी धर्मपुरी येथील चुलबंदी नदीवरील पुलावरून वडापाची टॅक्सी कोसळून भीषण अपघात झाला आहे. वडापाची टॅक्सीतून १२ जण प्रवास करत होते. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर इतर सहा जण जखमींना साकोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने वडापाची टॅक्सी ३० फूट खाली चुलबंदी नदी पात्रात कोसळली. सदर काळीपिवळी साकोली वरुन लाखांदूरला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या काळीपिवळीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी यात भरण्यात आले होते. त्यामुळे गाडी पुलावर अनियंत्रित होऊन खाली पडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करा, उदयनराजे भोसले यांचे आवाहन

News Desk

यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

Aprna

अधिवेशन संपण्यापूर्वी कलम ३५३ विषयासंदर्भात बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Aprna