HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या ‘त्या’ भाष्यावर मी बोलू शकत नाही – संजय राठोड 

यवतमाळ | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड आज (२४ फेब्रुवारी) सकाळी नागपूर मार्गे मुंबईला कॅबिनेट मिटींगला उपस्थित राहण्यासाठी निघाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सगळं सुरळीत झाला आहे. मी माझ्या कामकाजाला आजपासून सुरुवात करीत आहोत असे सांगितले. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत वनमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले होते. यावर या विषयावर मला काहीही बोलायचे नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने यावर बोलताना मी लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये असे आवाहन केले होते. मात्र, गर्दी जमली. नागरिक अजूनही गंभीरपणे कोरोनाला घेत नाही आहे. मात्र,आजपासून मी माझ्या कामकाजाला सुरुवात करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

शरद पवारांची नाराजी, घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. काल (२३ फेब्रुवारी) शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे मॅरेथाॅनमध्ये झिके अटलाव डेबेबे विजयी 

News Desk

कावेरी पाणी वाटपासाठी ३ मे रोजी सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी

News Desk

राष्ट्रवादीने देशातील पहिल्या ‘एलजीबीटी’ सेलची केली स्थापना

News Desk