HW News Marathi
महाराष्ट्र

फुले दाम्पत्यांला भारतरत्न द्या | मुख्यमंत्री

मुंबई | स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे महात्मा जोतीराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. या दोघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील वरळी येथील महासंघाचचे एनएससीए सभागृहात ओबीसी तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. अशी शिफारस केंद्राला केली आहे.’ तसेच येत्या दोन अर्थसंकल्पात ओबीसी महामंडळासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल. ओबीसींच्या हिताच्या योजना राबवताना भाजप सरकार हात आखडता घेणार नाही. त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवू,’ असे मुख्यमंत्री या मेळाव्या म्हणाले.

या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्च २०१८मध्ये लोकसभेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या केली होती.

Related posts

उर्मिलांकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, “पंकजा म्हणाल्या चला भेटू…”

News Desk

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रातून प्रतिसाद

News Desk

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ‘आक्रमक नेते’ नाना पटोलेंचा राजकीय प्रवास कसा आहे?

swarit