HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची पावले उचलण्याची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात आज भाजप जो काही आहे त्याचे श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जातं” – संजय राऊत  

News Desk

कोरोनाच्या उपाययोजनांना टाटा समूहाचा ५०० कोटींचा निधी जाहीर

swarit

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk