HW News Marathi
महाराष्ट्र

भुजबळांना जामीन मिळावा | प्रकाश आंबेडकर

पुणे | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी मालमत्ता तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी ईडी ने केलेल्या कारवाई नंतर तुरुंगात आहेत. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केले .

या प्रकरणी छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.

सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या कारवाई नंतर गेल्या अनेक दिवसात भुजबळ तुरुंगात आहे. भुजबळांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी भुजबळ समर्थकांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. भुजबळांची प्रकृती खराब असताना त्यांच्या समर्थकांनी या प्रकरणी राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, घरी राहूनच गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन

swarit

शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, पंतप्रधानांचे पुणेकरांना आवाहन

Aprna

#MaharashtraResult2019 : पवारांच्या ‘त्या’ भाषणामुळे उदयनराजेंचा पराभव

News Desk