HW News Marathi
महाराष्ट्र

आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा केला व्हाईट, किरीट सोमय्यांचा नाशिकमध्ये आरोप!

नाशिक। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काळा पैसा व्हाईट करण्यासाठी नाशिकमधील आर्मस्ट्राँग ही कंपनी उभी केली. त्यांचा मालक कोण? कुणाकडून ही जागा खरेदी केली याचा भुजबळांना खुलासा करावा, असे आव्हान भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे. इतकेच नव्हे तर मुंबईतील सांताक्रुझ येथे 9 मजली अलिशान इमारत आयकर विभागाने बेनामी मालमत्ता घोषित केली आहे. ज्या इमारतीमध्ये तुम्ही राहता त्याच्याशी तुमचा काय संबंध, हे मंत्री भुजबळांनी घोषित करावे असए आव्हानही त्यांनी दिले आहे.

भुजबळांनी तब्बल 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमधील आर्मस्ट्राँग या कंपनीची पाहणी केली. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोमय्या यांनी भुजबळांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले. आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला आहे. मुळात ज्यांच्याकडून ही कंपनी खरेदी केली ती कंपनीच बनावट आहे. तसेच मुंबईत दहा वर्षांपासून राहत असलेल्या 9 मजली इमारतीचे मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रा. ली. हे दाखवले आहेत. त्यांच्या तुमच्याशी काय संबंध हे देखील स्पष्ट करावे. आर्मस्ट्राँग असेल किंवा मुंबईतील इमारत या सर्व बनावट कंपनांच्या नावाने खरेदी करुन भुजबळांनी तब्बल 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.

त्यामुळे त्यांच्यावर मनी लाँण्ड्रींग अंतर्गत ‘ईडी’ने कारवाई केली आहे. माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना खुले आव्हान आहे की, त्यांनी या सर्व प्रकरणांचा खूलासा करावा. भुजबळांनाच विचारणा करावे की ही सर्व संपत्ती आली कोठुन? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण राज्यात संचारबंदी, पंढरपूरला मात्र वगळले! निवडणूकीसाठी सरकारचा निर्णय

News Desk

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत! – नाना पटोले

Aprna

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

News Desk