HW News Marathi
महाराष्ट्र

बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत

मुंबई | सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध गेम शोच्या १० व्या सिझनमधील केबीसी- कर्मवीर या विशेष भागात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे सहभागी झाले होते. या गेम शोमध्ये खेळून डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी २५ लाख रुपये जिंकले. तसेच हा कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्यासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. ७ सप्टेंबर रोजी केबीसीचा हा भाग प्रसारित झाला.

याची माहिती डॉ. प्रकाश आमटे यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. “अमिताभ बच्चन यांनी आपल्या देणगीचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही हे फार विशेष आहे. त्या बद्दल आम्ही प्रकल्पातर्फे त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम अजून दूरवर जाऊन पोहोचले आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा आहे. लोक बिरादरी प्रकल्पावर नितांत प्रेम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक व तसेच सर्व भारतातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने आमचा काम करण्याचा उत्साह द्विगुणित होत असतो.”, असे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाला १५ कोटीचे नुकसान, कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरुच

News Desk

कृत्रिम तलावांमधील ‘श्रीं’च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन

News Desk

ज्ञानवापी मशिदी प्रकरणी वाराणसी न्यायालयाने सर्वेक्षण कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना हटविले

Aprna