HW News Marathi
Covid-19

मोठी बातमी ! लस घेण्यासाठी आता कोविनवर रजिस्ट्रेशनची गरज नाही, केंद्राची माहिती

मुंबई । देशातील कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग मिळावा यासाठी आता लस घेण्यासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना ऑन द स्पॉट लस घेता येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, “कोरोना लसीकरणासाठी आता नागरिकांना रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेण्याची आवश्यकता नाही. १८ वर्षांवरील नागरिक आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करुन लस घेऊ शकतात.” केंद्राने घेतलेला हा निर्णय निश्चितच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय मानला जात आहे.

देशात यापूर्वी मात्र कोरोना लसीकरणासाठी आधी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन बंधनकारक होते. मात्र, आता केंद्राकडून हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २८ जूनपासून सलून-पार्लर्स सुरु होणार, ‘हे’ नियम बंधनकारक

News Desk

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज

News Desk