HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाचा कहर ! आज तब्बल ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण

मुंबई । राज्यातील दररोजच्या प्रमाणाबाहेर वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेणे राज्य सरकारसाठी अनिवार्य होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अत्यंत धक्कादायक पद्धतीने हा आकडा वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आज (२८ मार्च) जारी झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे यापैकी तब्बल ६ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. तर एकट्या पुण्यात यांपैकी ४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील २ प्रमुख शहरांमध्ये झालेली ही रुग्णवाढ पाहता शासन आणि प्रशासनाला अत्यंत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने, निर्बंध कठोर करण्याचे आणि वेळ पडली तर लॉकडाऊनसाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आज नवीन 17 हजार 874 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 3 लाख 25 हजार 901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याला पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार का ? हे पुढील काही दिवसांमध्ये निश्चित होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीतील लॉकडाऊन आणखी ३ दिवस वाढला !

News Desk

बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक, दोन जणांचा रिपोट पॉझिटिव्ह

News Desk

कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण

News Desk