मुंबई | राज्यात २१ मे रोजी विधान परिषदेसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज (८ मे) भाजपकडून विधान परिषदेसाठी ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांची नावे भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना भाजपकडून डच्चू देण्यात आला आहे. गेले अनेक दिवस भाजपच्या विधान परिषद उमेदवारीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपकडून यांपैकी कोणत्याही नेत्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही.
Bharatiya Janata Party (BJP) releases list of candidates for biennial elections for Maharashtra Legislative council scheduled to be held on 21st May. pic.twitter.com/0QB8JL3kAE
— ANI (@ANI) May 8, 2020
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. एकनाथ खडसेंच्या जागी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र, रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा त्यांच्याच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यासमोर पराभव झाले. पंकजा मुंडेंचा हा पराभव अत्यंत धक्कादायक मानला गेला. त्यानंतर, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे ही नाराजी व्यक्त देखील केली.
राज्यसभेच्या उमेदवारीदरम्यानही एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नावे जोरदार चर्चेत होती. विधानसभेची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेत या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तिथेही निराशाच दिसली. भाजपकडून नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आले. विधानसभा आणि राज्यसभेमुळे पक्षावर प्रचंड नाराज असलेल्या या दोन्ही नेत्यांना विधान परिषदेत तरी संधी दिली जाईल, असा अंदाज होता. खडसेंनी तर स्वतः तशी जाहीर इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, पुन्हा एकदा भाजपकडून या दोन्ही नेत्यांना डावलण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.