HW News Marathi
देश / विदेश

देशात पहिल्यांदाच महिला गुन्हेगाराला फाशी होणार!

अमरोहा | देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एक मोठी घटना घडणार आहे. भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव आहे. शबनमने प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. याची तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी देण्यात येणार आहे.

अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

शबनमने आपला प्रियकर सलीमच्या मदतीने १५ एप्रिल २००८ रोजी आपल्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली होती. यामध्ये तिच्या आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्याचा समावेश होता.

शबनचे गाव बावनखेडी आहे. बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी म्हणाले, २००८ साली झालेल्या हत्येनंतर आम्ही हादरून गेलो होतो. त्यावेळी गावातील अनेक मुलींचे नाव शबनम होते. त्यातील अनेक मुलींचे लग्न झाले आहे. २००८ सालानंतर गावातील एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवले नाही. शबनमला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलनेही सर्व कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होमचे दिले आदेश

swarit

कर्नाटकात कोरोना व्हायरसचा पहिला बळी

swarit

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली  

News Desk