HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी ‘भाजप’ची पहिली यादी जाहीर

मुंबई | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केल्या आहेत. मात्र, राज्यातील शिवसेना आणि भाजपची युती निश्चित असल्याचे काल (३० सप्टेंबर) परिपत्रकाद्वारे सांगितले. यानंतर भाजपची आज (१ ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर होणार आहे. भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढविणार आहे. तर कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच परळीतून पंकजा मुंडेंना विरुद्ध धनंजय मुंडे असा कलगी तुरा पाहायला मिळणार आहे. भाजपने मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. शिवेंद्रराजे सातारा विधानसभा मतदारसंघातून, तर सुधीर मुनगंटीवार बल्लालपूर, गिरीश महाजन यांना जामनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे.

 

पक्षांतर केलेल्या नेत्यांना मिळाली उमेदवारी

  • माण – जयकुमार गोरे
  • सातारा- शिवेंद्रराजे भोसले
  • तुळजापूर – राणा जगजितसिंह
  • शिर्डी – राधाकृष्णविखे पाटील
  • अकोले – वैभव पिचड
  • इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  • ऐरोली – संदीप नाईक
  • वडाळा – कालिदास कोळंबकर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई लोकल बाबतीत राजकरण नको, गृहमंत्र्यांनी खडसावले

News Desk

चोरलेल्या दुचाकी विहीरीत टाकून पोलीसांना गोंगारा

News Desk

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna