HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचा लोकसभेत धमाका, नवनीत राणा,पुनम महाजन, गिरीश बापट आक्रमक

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. सिंग यांचे आरोप गंभीर असून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपने केली. तर, ठाकरे सरकाच्या बचावासाठी पंजाबच्या काँग्रेस खासदाराने जोरदार बॅटिंग करत भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहारात भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून जोरदार आवाज उठवला. भाजपचे खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा हे लोकसभेत आक्रमक झाले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाह्यचे, असं सांगतानाच हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. गिरीश बापट यांनी लोकसभेत संपूर्ण भाषण मराठीत करत ही मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हनुमान चालिसा’मुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर आम्ही रोज म्हणू, फडणवीसांचे राज्य सरकारला आवाहन

Aprna

दगडफेक करण्यात पुरुषार्थ नाही, कुठली शिवसेना? मी ओळखत नाही!

News Desk

MPSC परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा; मुख्यमंत्र्यांची विनंती

Aprna