HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजीराजे, नाक दाबल्याशिवाय ठाकरे सरकारचं तोंड उघडणार नाही! – चंद्रकांत पाटलांचा सल्ला

“नाक दाबल्याशिवाय ठाकरे सरकारचं तोंड उघडणार नाही, लक्षात घ्या”, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता संभाजीराजेंनी पुन्हा आक्रमक व्हावं हे सुचवण्याचा चंद्रकांत पाटील यांचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. संभाजीराजे हे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं आहे. “मराठा आरक्षणाच्या विषयाचं नेतृत्त्व संभाजीराजेंनी केलं तर या चळवळीला बळ येईल”, असंही पाटील यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्यभर फिरण्याच्या संभाजीराजेंच्या निर्णयाचं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं. “संभाजीराजेंकडून फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कुणी तरी नेतृत्व देण्याची गरज आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी सर्व संघटना मैदानात उतरल्या होत्या. त्यात भाजपही होता. आता मराठा आंदोलनातही भाजप आहे. पण, भाजप असल्याने त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. परंतु, संभाजीराजे हे कोणत्याही पक्षाच्या पलीकडे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वामुळे या चळवळीला बळ येईल. मात्र, हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊत म्हणजे महान व्यक्तिमत्व!

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “महिला नेत्या काम करतात हे राऊतांना दिसतं. हे अदृश्य काम आहे पण त्यांना अदृश्य गोष्टीही पाहण्याचे डोळे आहेत. आम्ही मात्र सामान्य माणसं आहोत. काय करणार? ते महाभारतातील संजय आहेत. महान व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांना सगळं दिसतं”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना हाणला.

पवारांनी असं म्हणणं योग्य नाही!

“इन्कम टॅक्सची धाड पडणं, सीबीआयकडून चौकशी होणं हे अगदी कॉमन आहे. बाकीच्यांची चौकशी चालते? पण स्वतःवर आलं की सूड उगवण्याचा भाग? ‘चौकशी यंत्रणांचे अधिकारी अधिक वेळ थांबले. पाहुणाचार घेत आहेत’ हे असं पवारांनी म्हणणं योग्य नाही. खरंतर, शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर पहिल्यांदाच धाडी पडल्या आहेत”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहु महाराज जयंती निमित्त आयोजित दिंडीला उत्तम प्रतिसाद

News Desk

रावसाहेब दानवे अन् अब्दुल सत्तार यांच्या गळाभेटी; राजकीय चर्चेला उधाण

Aprna

बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील, कॅलेंडच्या ‘त्या’ टीकेवर राऊतांचे उत्तर 

swarit